पीएनपी चषकच्या व्यासपीठावर स्व. प्रभाकर पाटील यांना अभिवादन

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगडचे भाग्यविधाते स्व.प्रभाकर पाटील भाऊ यांना पुण्यतिथी निमित्त पीएनपी चषक 2024 च्या व्यासपीठावर विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच, पीएनपी चषकाचा महासंग्राम पाचव्या दिवसाच्या अंतिम दिवसाच्या स्पर्धेचे उदघाटन या प्रसंगी पार पडले.

याप्रसंगी शेकापचे जेष्ठ नेते भाऊंचे सहकारी शंकरराव म्हात्रे (आप्पा ), जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सौ. सुप्रियाताई पाटील, पीएनपी इन्फ्राचे संचालक नृपाल पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती अँड. विजय पेढवी, रायगड बाजारचे व्यवस्थापक प्रमोद घासे, यू.व्ही. स्पोर्ट्स अकॅडमीची संचालिका चित्रलेखा पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version