शेकापच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनी दिवंगतांना आदरांजली

। अलिबाग । वार्ताहर ।
शेकाप मेळाव्याचा प्रारंभ ध्वजारोहणाने करण्यात आला. त्यानंतर व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर आ. बाळाराम पाटील यांनी दुखवट्याचा ठराव मांडला. ज्येष्ठ नेते प्रा. एनडी पाटील, गणपतराव देशमुख, श्रीमती सुलभाकाकू पाटील, प्रमोद पाटील, प्रवीण पाटील, प्रवीण कदम, अनंतशेठ भोईर, अनंतराव देशमुख या कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ, सीमेवर लढणारे जवान, अमरनाथ यात्रेकरु आणि पुरामुळे निधन झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

अभिनंदनाचे ठराव
मेळाव्यात भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्येष्ठ नेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेह अभिनंदन करणारा ठराव यावेळी मांडण्यात आला.टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले.

Exit mobile version