। उरण । वार्ताहर ।
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व पक्षाचे सर्वोच्च नेते कॉम्रेड सीताराम येचुरी यांना रविवारी (दि.22) महाविकास आघाडीच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. उरणच्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके सभागृहात आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी उरण आणि रायगडातील शेतकरी व जनतेसाठी केलेल्या कार्याबद्दल सभेत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सचिव कॉ. रामचंद्र म्हात्रे हे होते. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार प्रितम म्हात्रे, कामगार नेते कॉ. भूषण पाटील, काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे,उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, मधुसूदन म्हात्रे, काका पाटील, सत्यवान ठाकूर, प्रवीण पुरो,संतोष पवार यांनी आदरांजली वाहिली.