। जळगाव । प्रतिनिधी।
जळगाव राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला, तर एक चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.
ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि. 28) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. जळगाव राष्ट्रीय महामार्गावरून दोन तरुणी एक वर्षाच्या चिमुकल्यासह दुचाकीने खोटेनगर स्टॉपकडून उड्डाण पुलाने मानराज पार्ककडे जात होत्या. उड्डाणपूल उतरताच भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीवरील दोन्ही तरुणींचा जागीच मृत्यू झाला, तर चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेननंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच, दोन तरुणींचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असून पोलीस ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.