आदर्श पालक होण्यापेक्षा आनंदी पालक होण्यासाठी प्रयत्न करा

डॉक्टर मुले अशी का वागतात परिसंवादातील डॉक्टरांचा सुर
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुलं वाईट नाहीत तर पालकच त्याला जबाबदार आहेत. कुणीच परफेक्ट नाही प्रत्येकाकडून छोटया मोठया चुका होतातच त्या चुका होऊ न देण्यासाठी प्रयत्न करा. घरातील वातावरण दुषीत झाल्याने मुले अशी वागतात त्याला पालकच जास्त जबाबदार असू शकतात. पालक म्हणून मुलं आनंदी सक्षम राहण्यासाठी प्रयत्न करा. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याइतके त्यांना सक्षम करा. आदर्श पालक होण्यापेक्षा आनंदी पालक होण्यासाठी प्रयत्न करा असा सुर डॉक्टर मुले अशी का वागतात परिसंवादातील राज्यभरातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी लावला.


महाराष्ट्र, गोवा व गुजराथ या तीन राज्यांच्या बालरोगतज्ञांचे अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर मुले अशी का वागतात पालकांकरिता या परिसंवादात हा सुर लावला. पी.एन, पी. नाटयगृहात आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादाचे उद्घाटन पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसंवादात बालरोग तज्ज्ञ संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉ जयंत पांढरीकर, प्रा डॉ निवेदिता पाटील, कोल्हापूर, डॉ अमोल अन्नदाते, वैजापूर, डॉ राजीव धामणकर, अलिबाग आणि डॉ चंद्रशेखर दाभाडकर, महाड, डॉ सदाचार यांनी सहभाग घेतला. सुरुवातीला आपल्या मनोगतात चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, मुलांच्या संगोपनात लॉकडाऊनंतर पालकांचे गांभीर्य वाढले. सर्व परिस्थिती बदल्यामुळे अनेक आव्हान उभे राहिले. अलिबागमधून डॉक्टर इंजिनीयर निर्माण झाले पाहिजेत आणि त्यांनी याच मातीत सेवा केली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. परिसंवादात बोलताना डॉ अमोल अन्नदाते म्हणाले की, येऊ घातलेल्या आधुनिक काळात आपल्या मुलांना यशस्वी समाधानी सक्षम आणि आनंदी मुलं घडवणे तरच ते मोठं बनेल. मुलं सगळ्यात जास्त आईवडिल एकमेकांवर किती प्रेम करतात हे लक्ष देऊन पहात असतता. त्यामुळे एकमेकांवर प्रेम करा असा सल्ला आवर्जून डॉ अन्नदाते यांनी पालकांना दिला. डॉ चंद्रशेखर दाभाडकर यांनी आपले मत व्यक्त करताना मुलं हि आरशासारखी असतात. प्रत्येकात एक छोटं मुल आहे. त्यांच्याशी वागताना बालपण जपा. तुम्ही जसे वागाल मुलं तशी घडतील. त्यामुळे आपले वर्तत आदर्श आणि आनंदी ठेवा असे आवाहन केले. डॉ राजीव धामणकर यांनी पालकच संकूचित होतोय हे सांगताना संकूचितपणा बाजूला सारुन एम्पथी शिकवण्याची गरज व्यक्त केली. पूर्व प्राथमिक सर्वात जास्त लक्ष देण्याची गरजही डॉ धामणकर यांनी व्यक्त केली. तर डॉ जयंत पांढरीकर यांनी प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळया पालक म्हणून आनंदी, सक्षम रहाण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या मुलांसोबत कायम खुलेपणोन संवाद साधण्याचे आवाहन केले. तर प्रा. डॉ. निवेदिता पाटील यांनी या परिसंवादाचे सुत्रसंचलन केले. कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन डॉ विनायक पाटील, डॉ राजेंद्र चांदोरकर, डॉ निशिगंध आठवले यांनी केले.

Exit mobile version