राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे दोन लाभार्थी

उरण | वार्ताहर |
राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेंतर्गत उरण तालुक्यातील उरण नगरपरिषद हद्दीतील भवरा कातकरवाडी येथे राहणार्‍या चिनीबाई महादू कातकरी व देवकी विठ्ठल कातकरी यांना सदर योजनेंतर्गत प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान धनादेश उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार (दि. 1) तहसील कार्यालयात महसूल नायब तहसीलदार नरेश पेढवी यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी महसूल विभाग अव्वल कारकून गणेश गोरेगावकर, नगरसेवक नंदू लांबे आदी उपस्थित होते. उरण नगर परिषदेचे नगरसेवक नंदू लांबे यांनी लाभार्थांना अनुदान मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले. ज्या व्यक्तीचे नाव दारिद्र्यरेषेखाली आहे, त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कर्ता व्यक्तीचे अपघाती किंवा नैसगिक मृत्यू झाला असेल तर अशा व्यक्तीच्या (लाभार्थ्याला) वयाच्या 60 वर्षांपर्यंत वारसांना 20 हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यांनी तीन वर्षांच्या आत अर्ज केला पाहिजे, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.

Exit mobile version