| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
रिझर्व्ह बँक ऑफ (आरबीआयने) ने खासगी क्षेत्रातील एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेला नियमांचे पालन न केल्याबद्दल कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबतचे प्रसिद्धपत्रकदेखील देण्यात आले आहे. दोन्ही बँकांवर 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात निष्काळजीपणा करणार्या सर्व लहान-मोठ्या बँकांवर कठोर कारवाई सुरूच ठेवली आहे. बँकांकडून ग्राहकांना दिल्या जाणार्या सेवांमध्ये निष्काळजीपणाची प्रकरणे समोर आल्यानंतर दंडाची ही कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. यामध्ये केवायसी, ठेवींवरील व्याजदर आणि इतर बाबींचाही समावेश आहे.