तीन बोटी सुदैवाने वाचल्या...
मुरुड | संतोष रांजणकर |
काल सायंकाळी मुरुड मध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढले हा पाऊस इतका प्रचंड होता की गाराबी व खार अंबोली येथून येणार प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे एकदारा येथील चार बोटी व मुरुड येथील एक अशा पाच बोटी वाहून गेल्या होत्या. त्यातील तीन बोटींना वाचवण्यात यश व दोन बोटींना जलसमाधी मिळाली. मुरुड शहरात भोसले वाडी, लक्ष्मी खार, शेगवाडा परिसरात अनेक घरात पाणी शिरले होते.
दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी मुरुड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काडले. सलग १२ तासाहून अधिक काळ पडणाऱ्या पावसामुळे गारंबी व खार अंबोली धरणाच्या पाण्यात मोठी वाढ झाल्याने एकदरा खाडीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊ लागला. याचा फटका या खाडीत उभ्या असलेल्या मच्छीमारी करणाऱ्या बोटींना बसला. एकदरा खाडीतील पाण्याच्या प्रवाहात प्रचंड वाढ झाल्याने मच्छीमार बोटी दोर तुटून वाहून गेल्या यातील मुरुड येथील जंजीरकर यांच्या बोटीला जलसामधी मिळाली व एकदरा येथील त्यांचेच भाऊबंद जंजीरकर यांच्या ही बोटील जलसमाधी मिळाली. तिसरी बोट मुरुड बीचवर वाळूत जाऊन अडकली होती ती सुखरूप वाचता आली. इतर दोन बोटी वाहून जात असताना इतर बोटींच्या सहाय्याने वाचवण्यात आल्या. त्यामुळे एकदरा व मुरुडच्या जांजिरकर कुटुंबाच्या बोटींचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
ही घटना स्तानिक मच्छीमारांच्या लक्षात येताच मच्छीमार बाधावांनी मिळून बोटी वाचविण्याचा शर्थीचे प्रयत्न सुरू केले. एकदरा येथील जंजीरकर यांची बोट वाचवण्यात यश आले. मुरुड येथील जंजिरकर यांच्या बोटीला पाण्यातून बाहेर काडण्याचे शर्थीचे प्रयत्न स्थानिक मच्छीमार करत आहेत. तरी या दोन्ही बोटीवर असलेली झाली वाहून गेली व बोटीचे इंजिन मध्ये पाणी गेल्याने निकामी झाले. त्यामुळे या दोन्ही बोटीचे लाखोंचे नुकसान झाले आहे.