सराईत दोन गुन्हेगारांना अटक

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल परिसरासह धुळे या ठिकाणी गुन्हे करणार्‍या दोन सराईत गुन्हेगारास खांदेश्‍वर पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्या अटकेमुळे नवीन पनवेल परिसरातील महत्वाचा गुन्हा उघडकीस आला आहे .

कांताराम देवराम बाखे,रा. उलवे हे तेजोमय सोसायटी समोर सेक्टर नं. 07, नवीन पनवेल, येथे नातेवाईकांकडे आले होते. तेथे रस्त्याचे कडेला उपस्थित दोन इसमांनी ते बीएमसीचे कर्मचारी असून रस्त्यावर का थुंकले ? अशी विचारणा करून त्यासाठी 5000/- रुपये दंडाच्या रक्कमेची मागणी केली. परंतु कांताराम देवराम बारवे यांचेकडे रोख रक्कम नसल्याने कांताराम देवराम बारवे यांचेकडुन त्यांचे एस बँकेचे एटीएम कार्ड व पिन नंबर घेवून त्यांचकडील पांढ-या रंगाचे स्कुटीवर कांताराम देवराम बारवे यांना बसवुन शिवा कॉम्प्लेक्स नवीन पनवेल येथील एसबीआय बॅकेचे एटीएम सेंटर येथे नेले. सदर एटीएम सेंटर मधुन 10,000/- रुपये काढून घेतल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी दोन अनोळखी इसमांविरुध्द खांदेश्‍वर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपास करुन नमुद गुन्हयाचे घटनास्थळाच्या आजुबाजुचे तसेच एसबीआय बँकेचे एटीएम सेंटरमधील सीसीटिव्ही फुटेज प्राप्त केले. त्या आधारे व तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्हयाचा कौशल्यपुर्वक तपास करुन तसेच खास बातमीदारमार्फत मिळालेल्या खात्रीशिर बातमीवरुन निलेश भटु दिघ,व एडवीन अरुण साळवे, यांना दिंडोशी मुंबई येथुन ताब्यात घेऊन त्यांचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने सखोल तपास केला असता त्यांचा नमुद गुन्हयात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्यांनी सदर गुन्हयात वापरलेला एक मोबाईल व गुन्हयात वापरलेली एक सुझुकी कंपनीची स्कुटी असा एकुण 55 हजार रुपयाचा मुद्देमाल नमुद आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे.

Exit mobile version