| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून आरोग्य विषयक कामांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार रायगड जिल्हा परिषदेकडून आपला सेस फंड केवळ स्वच्छतेवर खर्च केला जात आहे. त्या निधीमधून नेरळ ग्रामपंचायतीसाठी दोन नवीन घंटागाड्या उपलब्ध झाल्या आहेत. या गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले असून साधारण 16 लाख 80 हजार रुपये खर्चातून या घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत.
नेरळ ग्रामपंचायत सेस फंडातून जिल्ह्यात स्वच्छतेवर खर्च केला जात असून वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता यासाठी हा निधी वापरण्यात येत आहे.जिल्हा परिषदेने त्या निधीमधून नेरळ ग्रामपंचायतसाठी दोन नवीन घंटा गाड्या मंजूर झाल्या होत्या. 8 लाख 38 हजार रुपयांची 1 अशा 2 गाड्या जिल्हा परिषद सेस निधीमधून मिळाल्या आहेत. या दोन्ही गाड्या सीएनजी इंधनावर चालणाऱ्या असून त्या नेरळ ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. त्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीकडून या दोन्ही गाड्यांचे लोकार्पण कर्जत पंचायत समितीच्या सभापती नमिता घारे, उप सभापती चित्रा ठाकरे व जिल्हा परिषद नेरळ गटाच्या सदस्या सुनीता मोरे यांचे हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर, ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
नेरळ ग्रामपंचायतीसाठी दोन घंटा गाड्या
