। जालना। प्रतिनिधी ।
जालना शहरातील नाव्हा चौफुली परिसरातील फॉरेस्ट ऑफिस जवळ ही घटना घडली. शुक्रवारी ( दि. २३ मे ) रोजी पार्थ फाटे त्याचा मित्र सोबत फोटोशूट करत होता, तेव्हा सूजल अंबिलवादे दोन मित्रांसह पार्थला भेटण्यासाठी आला.दरम्यान पार्थ आणि सुजलची मस्करी चालू असताना सुजल सोबतच्या इतर दोन अनोळखी मुलांना राग आला. त्यांनी आमच्या मित्राला असे बोलू नको, असे म्हणत पार्थवर चाकूने वार केला. त्यांनी पहिला वार पार्थच्या पोटावर केला.
पार्थ तिथून पळू लागला. पुढे त्याचा पाठलाग करत पुन्हा त्याच्यावर चाकूने हातावर वार करण्यात आला. पार्थला सोडवायला आलेल्या अभिषेक तुकाराम काजळे याच्यासुद्धा डोक्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी जालना पोलीस स्टेशन येथे दोन अनोळखी मूलांन विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीसांचा तपास सुरु आहे.