अलिबाग | प्रतिनिधी |
बॉम्बशोधक पथक रायगड, अलिबाग येथील PSI सय्यद व स्टाफ यांना माणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेल्या गुन्हयातील जप्त मुद्देमाल जिलेटीन व डिटोनिटर वगैरे मुद्देमाल नाश करण्याचा आदेश देण्यास आला होता. हा मुद्देमाल दि. 8/3/2022 रोजी संध्याकाळी 06.45 वाजण्याच्या सुमारास इसाने कांबळे हद्दीत जावेद ईसाने याच्या क्रशरच्या मागे नष्ट करीत असताना ब्लास्ट झाला.

यामध्ये बॉम्बशोधक पथकातील आशिर्वाद महादू लडगे वय-45, PN/1200 रमेश राघो कुथे वय-36 हे दोघे गंभीर झाले आहेत. त्यांच्यावर तातडीने ग्रामीण रुग्णालय, महाड येथे औषधोपचार करून पुढील उपचाराकरिता एमजीएम हॉस्पिटल, मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. तसेच पोलीस नाईक 2353 राहुल महादेव पाटील यांना किरकोळ दुखापत झाली असल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, महाड येथे औषधोपचार करण्यात आलेले आहे, त्यांची तब्येत स्थिर आहे.