| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-रेवस मार्गावरील खडताल पूलाजवळ दोन दुचाकींचा रविवारी सायंकाळी अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जितेंद्र वाघमारे (39) रा. खोपोली व राजा राजपूत (34) असे या जखमींची नावे आहेत. दोघेही आपआपल्या दुचाकीवरून अलिबाग-रेवस मार्गावर प्रवास करीत होते. दरम्यान, सायंकाळी सव्वा आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास खडताळ पूलाजवळ समोरासमोर ठोकर लागून हा अपघात झाला. अलिबागमधील रुग्णालयात जखमी उपचार घेत आहेत.







