कंटनेरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

। पनवेल । वार्ताहर ।
उलवे येथून बेलापूरच्या दिशेने जाणार्‍या मोटरसायकल चालकास पाठीमागून येणार्‍या भरधाव कंटेनर चालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाल्याची घटना तरघर येथील उड्डाणपुलावर घडली. या अपघातानंतर एनआरआय पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.
या अपघातात मृत झालेल्या मोटारसायकल चालकाचे नाव सुभाषचद्र यादव (36) असे असून तो उलवे भागात राहण्यास होता. तसेच तो टाईल्स बसवण्याची कॉन्ट्रॅक्ट घेत होता. सुभाषचंद्र हा बजाज डिस्कवर मोटारसायकलवरुन आपल्या कामावर बेलापुरच्या दिशेने जात होता. यावेळी त्याची मोटारसायकल तरघर येथील उड्डाणपुलावर आली असताना, पाठीमागून येणार्‍या भरधाव कंटेनरने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात सुभाषचंद्र याचा जागीच मृत झाला. या अपघातानंतर एनआरआय पोलिसांनी कंटेनर चालक राजकुमार गुफ्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version