रक्ताने माखताय रस्ते, दोन दिवसांत दोन तरुण दगावले
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. जासई दास्तान-चिर्ले रेल्वे उड्डाण पुलावर शुक्रवारी (दि21) रात्री 9.30 च्या सुमारास एका अज्ञात टेम्पो चालकाने मोटारसायकल चालकाला धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, अपघातग्रस्त टेम्पोचालक फरार झाला आहे. मोहम्मद जफिर मोहम्मद समीर शहा (45) असे मयत युवकाचे नाव असून, या तरुणावर अंत्यसंस्कार होताच न होताच तोच गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणार्या कंटेनर ट्रेलरने मोटारसायकलस्वाराला जांभुळपाडा बस स्थानकाजवळ चिरडून टाकल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर अपघात हा शनिवारी (दि. 22) सायंकाळी पाचच्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, शुक्रवारी (दि.21) रात्री ठिक 9.30 च्या सुमारास चिर्ले मार्गावरुन मोटारसायकलस्वार दास्तान फाट्याकडे रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलावरुन जात असताना पुलावरून भर धाव वेगाने येणार्या टेम्पो चालकाने त्यास धडक दिली आणि अपघातग्रस्त टेम्पो चालक फरार झाला. या झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा उपचाराअभावी जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहम्मद जफिर मोहम्मद समीर शहा वय 45 असे अपघातग्रस्त मयत युवकाचे नाव असून, या तरुणावर अंत्यसंस्कार होताच न होताच तोच गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावरुन भरधाव वेगाने जांभूळपाडा येथून जाणार्या कंटेनर ट्रेलरने मोटारसायकल स्वाराला चिरडून टाकल्याची घटना शनिवारी (दि.22) सायंकाळी ठिक 5 च्या सुमारास घडली. या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, सदर मयत युवक हा पनवेल तालुक्यातील वांवजे गावातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दोन्ही अपघाताची माहिती उरण पोलिसांना तसेच उरण वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामे सुरू केले आहेत. मात्र महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको तसेच संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उरणचे रस्ते हे निष्पाप तरुणांनाच्या रक्ताने माखताय तरी उरणमधील रस्त्याजवळील अनधिकृत कंटेनर यार्ड, इतर बांधकामे, भंगाराची दुकाने,बेशिस्त अवजड वाहनांच्या वाढत्या वर्दळीवर तात्काळ कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी संतप्त प्रवासी नागरिक करत आहेत.