एक जण गंभीर जखमी
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील काळबादेवी येथे म्हाडाच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला तर, एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील काळबादेवीमधील चिरा बाजार येथे सोमवारी (दि. 26) दुपारच्या सुमारास म्हाडा इमारतीच्या आवारामधील संरक्षक भिंत कोसळली. इमारतीच्या संरक्षक भिंतीच्या बाजूला अन्य इमारतीचे काम चालू असून त्याठिकाणी केबल टाकण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी म्हाडाच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत विनयकुमार निषाद (30) आणि रामचंद्र सहानी (30) या दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर सनी कनोजिया (19) हा गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.