| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सुधागड तालुक्यातील संघटनात्मक बांधणीला ठाणाळे गावातून बळ मिळाले आहे. असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या आदेशाने तालुका प्रमुख नंदू सुतार, उपतालुका प्रमुख किशोर दिघे यांच्या मार्गदर्शनाने आणी किशोर पवार यांची सुधागड तालुक्यात चालू असलेली समाजसेवा व पक्ष बांधणी आणि निडर नेतृत्वावर विश्वास ठेवून शाखा प्रमुख चंद्रकांत फाटे विभाग संघटिका नांदगाव विभाग साधना फाटे यांच्या उपस्थितीत ठाणाळे गावातून कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. जनतेच्या दैनंदिन अडीअडचणी, स्थानिक विकासाचे प्रश्न, मूलभूत सुविधा, रोजगार, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. पदापेक्षा जनतेशी असलेला संपर्क आणि त्यांच्या प्रश्नांसाठी केलेले काम महत्त्वाचे आहे, असा निर्धार किशोर पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे ठाणाळे परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनेला नवचैतन्य मिळाल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सुधागडच्या ठाणाळेत उद्धवसेनेला बळ
