। मुंबई । प्रतिनिधी ।
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली ही समाधानाची बाब, मात्र आंदोलन केल्या नंतरच सरकार मागण्या मान्य करत आहे, अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिली आहे. उज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर धनंजय देशमुख यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे.