अनधिकृत भंगार गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी

| उरण | वार्ताहर |

उरण नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील बोरी पाखाडी येथील मोरा बंदर-उरण शहर रस्त्यावर असणाऱ्या अनधिकृत भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात शासकीय जागेवर अनेकांनी अनधिकृत बस्तान मांडून व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे वारंवार या तालुक्यात बेकायदा भंगाराच्या व्यवसायाला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. उरण नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील बोरी पाखाडी येथील अनधिकृत भंगाराच्या व्यवसायाला शुक्रवारी (दि.27) सकाळी ठिक 10 वा.च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने संतोष पवार, नरेश रहालकर, नितीन पाटील सह इतर रहिवाशांनी सावधगिरी बाळगून एन.ऐ.डी, सिडको, जेएनपीए आणि ओएनजीसी अग्निशमन दलाच्या जवानांना सदर घटनेची माहिती दिली.

आग कशामुळे लागली हे कारण स्पष्ट झाले नाही. तसेच कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. भंगाराचे गोदाम हे अनाधिकृत आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे करत आहेत. एकंदरीत उरण बायपास रस्ता लवकरच झाला असता तर अग्निशमन दलाच्या गाड्यांना अडथळा निर्माण झाला नसता. तरी बायपास रस्ता लवकरच लवकर होणे हे गरजेचे आहे.

डॉ उध्दव कदम तहसीलदार, उरण
Exit mobile version