सुनील तटकरेंचे सूचक विधान
| छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी |
आम्हाला टी- ट्वेंटी आणि 50 षटकांचे सामने जिंकायचे असून,अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही तशी तयारी केली असल्याचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी जाहीर केले. सुनील तटकरे यांनी छत्रपती संभाजीगनरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी शरद पवारांवरही अप्रत्यक्षपणे निशाना साधला. शरद पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना तटकरे यांनी मी सुद्धा क्रिकेटमधला खेळाडू आहे पण या संदर्भात मी काही बोलणार नाही. अचूक टप्प्यावरच्या चेंडूला देखील काही काही वेळेला षटकार बसू शकतो. आम्ही केवळ निर्धाव ओवर काढण्यासाठी मैदानात उतरलो नाही. मार्च एप्रिल मध्ये येणारी टी-ट्वेंटी आम्हाला जिंकायची आहे. याशिवाय 50 षटकाचे सामने आम्हाला ऑक्टोबर मध्ये जिंकायचे आहेत, असं सुनील तटकरे म्हणाले. कसोटीप्रमाणे पुढच्या पाच वर्षासाठी काम आम्हाला चालू ठेवायचे आहे. या तिन्ही पद्धतीच्या खेळासाठी आम्ही तयार झालेलो आहोत, असे तटकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे त्यांचा फुटलेला पक्ष अधिक फुटू नये, यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही जनतेमध्ये जातो आहोत. जनतेची सेवा करण्यासाठी आणि त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि व्यापक प्रमाणामध्ये जनाधार एन डी ए च्या पाठीमाग कसा निर्माण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं तटकरे म्हणाले. पावसाळ्याने ओढ दिली असल्यामुळे मराठवाड्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. परभणीला येत असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जी बैठक घेतली आहे.
शरद पवारांना अजित पवार यांच्या भेटीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. या संदर्भात मी काही बोलणार नाही. दादांच्या नेतृत्वात घेतलेला निर्णय ,त्या निर्णयाशी आम्ही ठाम आहोत. उद्याच्या भविष्यातील निवडणुका अजित पवार यांच्या नेतृत्वात घड्याळाच्या चिन्हावर लढणार आहोत.
सुनील तटकरे,खासदार
संजय राऊत चांगले संपादक आहेत, माझ्या जिल्ह्यातील आहेत. माझा त्यांचा चांगला परिचय आहे. मात्र त्यांचं थोडं मानसिक संतुलन बिघडल्यासारखंच झालं असल्याचं चित्र निर्माण झाल आहे.केवळ रोज वेगवेगळे दावे करणे आणि माध्यमांसमोर जाणं हा एकमेव उद्देश नजरेसमोर ठेवून ते काम करत आहेत. 2019 ला शब्दप्रयोग होता की खिडकी उघडलं की पाऊस, आणि टीव्ही लावला की राऊत तशी परिस्थिती होती. आता संजय राऊत यांच कुठलंही मत महाराष्ट्रातील जनता गांभीर्याने घेत नाहीत, असं तटकरे म्हणाले.