मोरगिरी येथे अनारोग्यकारक वातावरण

मऍक्युव्हेदरफऍपवर सलग तीन दिवस नोटीफिकेशन

| पोलादपूर | वार्ताहर |

तालुक्यामध्ये कोणताही रासायनिक कारखाना नसताना तालुक्यातील मोरगिरी येथे अनारोग्यकारक वातावरण असल्याचे सलग तीन दिवस नोटीफिकेशन मऍक्युव्हेदर ऍपवरून ऍण्ड्रॉईड मोबाईलद्वारे इंटरनेट सुविधेचा वापर करणार्‍यांना प्राप्त होत आहे. मात्र, पोलादपूर तहसिल कार्यालयाला अद्याप कोठेही अनारोग्यकारक वातावरण अथवा प्रदूषण असल्याचे आढळून आले नाही. या प्रकाराबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे.

ऍण्ड्रॉईड मोबाईलद्वारे इंटरनेट सुविधेचा वापर करणार्‍यांच्या मोबाईलवर गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील मोरगिरी भागामध्ये अनारोग्यकारक वातावरण निर्माण झाल्याचे नोटिफिकेशन म्हणजेच सूचना प्राप्त झाल्या आहेत. या नोटीफिकेशनमध्ये शनिवारी एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच एक्युआय 151 ते 200 पर्यंत असणे म्हणजे अनहेल्दी आणि 200च्या पुढे असणे म्हणजे व्हेरी अनहेल्दी असल्याचे निर्देशित करण्यात आले होते. त्यावेळी एक्युआय 151 म्हणजेच अनहेल्दी असल्याचे दिसून आले. रविवारी हा एक्युआय चक्क 203 म्हणजे व्हेरी अनहेल्दी असल्याचे नोटीफिकेशन प्राप्त झाले. या सुचनेमध्ये हवेचा दर्जा अतिशय खराब असून दरवाजा बंद करून राहण्याचा सल्ला या मऍक्युव्हेदर ऍपवरून देण्यात आला होता. यासोबतच सकाळी 10 वाजता 151.9 एक्यूआय असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास 203.3 असल्याचे नोटीफिकेशनमध्ये नमूद करण्यात आले होते. यावेळी तुमच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून रहा, असे या सुचनेमध्ये नमूद करण्यात आले. या एक्युआय म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स हवेचा दर्जा खराब असल्याचे स्पष्टीकरण करताना 12.9 सल्फर डायऑक्साईड, 33.6 नायट्रोजन डायऑक्साईड, 16.6 ओझोन म्हणजे ऑक्सीजन ट्रायॉक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड 2.9 असे प्रमाण हवेमध्ये असल्याने हवा आरोग्यास अपायकारक असल्याचे मेसेज अनेकांच्या मोबाईलवर झळकले.

या व्हेरी अनहेल्दी वातावरणामुळे अनेकांना श्‍वासोच्छवासाचे विकार, हृदयरोग, मज्जाघात आणि फुफ्फुसाचा कर्करोग आदींची तसेच पुर्वीपासून आजारी असणार्‍यांना वेगवेगळे आजार होण्याची शक्यता निर्माण होत असते. सर्वसाधारण जनतेसाठी हा मव्हेरी अनहेल्दी वातावरणाचा इशारा सावधगिरीचा इशाराच असतो. मात्र, पोलादपूरसारख्या कोणत्याही प्रकारची रासायनिक कारखानदारी नसलेल्या तालुक्यामधील निसर्गाचा कुशीतील मोरगिरीसारख्या गावामध्ये अशाप्रकारचे मव्हेरी अनहेल्दी वातावरण असल्याचे नोटीफिकेशन आता पोलादपूरकरांना निसर्गाचा खडबडून जागे करणारा इशारा असल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version