खोपोली बाजारपेठेत सापडले अजाण बालक; पोलिसांकडून पालकांचा शोध सुरु

| खोपोली | वार्ताहर |
खोपोली बाजारपेठेत एक अजाण बालक आढळून आला आहे. तो अतिशय भांबावलेल्या अवस्थेत असून त्याला आपला पत्ता सांगता येत नाही. घाबरलेल्या अवस्थेत तो त्याचे नाव अंकित आणि वडिलांचे नावं संदिप असे सांगत आहे.

अद्याप त्याचे कोणी नातेवाईक आले नसून त्याची खोपोली पोलीस स्टेशनमध्ये विचारपूस केली जात आहे.

मोहन, केदार यांनी त्या मुलासंदर्भात माहिती दिली असून त्याला खोपोली पोलीस स्टेशन येथे आणले आहे. हा मुलगा कोणाच्या परिचयाचा असल्यास खोपोली पोलीस स्टेशन येथे त्वरित संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version