मुरुडमध्ये अवकाळी पाऊस

आंबा पिकांचे नुकसान
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूड तालुक्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी पहाटे वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. सध्या आंब्याची झाडे मोहोरांनी भरलेली आहेत. अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
मुरूड तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे क्षेत्र आहे. काही ठिकाणी तर आंब्याची झाडे फळांनी लगडलेली आहेत. त्याबरोबरच बागायती पीक, भाजीपालावर्गीय पिकांची नासाडी झाली आहे. मुरूड सह पंचक्रोशी भागातील काही शेतकर्‍यांनी आपली भातशेती कापुन पूर्ण करून त्या पिकाच्या एकत्रित अडव्या केल्या आहेत. तर काही ठिकाणी भाताची मळणी – झोडणी करून धान्य एकत्रित साठविण्यात आले आहे. परंतु या पडलेल्या अवकाळी पावसामुळे भात पीक अडचणीत आले आहे. आहे. या हवामानाच्या बदलामुळे भात शेती करणारा, आंबा-काजु उत्पादन करणारा शेतकरी चारही बाजूने संकटात सापडला आहे.

Exit mobile version