उरणची शिवसेना ठाकरेंसोबतच

नेते, कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्धार
| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची बैठक माजी आमदार मनोहर भोईर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शाखा नवीन शेवा येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना उरण तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहतील असा निर्धार व्यक्त करून सर्वानी तशी प्रतिज्ञा घेतली.

यावेळी दिनेश पाटील, नरेश रहाळकर, संतोष ठाकूर, बी .एन. डाकी, जे.पी. म्हात्रे, गणेश शिंदे, विजय भोईर, ममता पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून आपण सर्व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत असून पुन्हा एकदा जोमाने कामाला लागून शिवसेना बांधणीसाठी व वाढविण्यासाठी सर्वाना आवाहन केले. यावेळी बंडखोर आमदार यांच्यावर जोरदार टीका केली, तसेच पक्षाने दिलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशा सूचना केल्या. या बैठकीत घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर, शिक्षक सेनेचे हितेंद्र म्हात्रे व युवा सेनेचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे यांनी केले. तालुक्यातील शिवसेनेचे सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version