उरणच्या विद्यार्थिनींचे बुद्धिबळ स्पर्धेत यश

| उरण | वार्ताहर |

रायगड जिल्हा क्रीडाधिकारी यांच्यावतीने शालेय बुद्धिबळ झोनल (विभागीय) निवड स्पर्धा गुरुवारी (दि.24) क्रीडा संकुल, अलिबाग येथे घेण्यात आली. या स्पर्धेत उरण तालुका चेस असोसिएशनने घवघवीत यश संपादन केले आहे.

14 वर्षांखालील या गटात रोटरी स्कूल उरणची विद्यार्थिनी बिशानी पाटील हिने सहापैकी पाच गुण मिळवून जिल्ह्यात तिसरी आली. तर 19 वर्षांखालील मुलींच्या गटात जिल्ह्यामध्ये सेंट मेरी हायस्कूल उरणची सारा प्रशांत पाटील-द्वितीय, दिव्या पाटील-तृतीय, यूइएस स्कूल उरणची तन्वी सुनील कुंभार ही पाचवी आली आहे.

या सर्व विद्यार्थिनींची रत्नागिरी येथे होणार्‍या विभागीय (झोनल) स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थिनींस उरण तालुका चेस असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शालेय तसेच सर्वच क्षेत्रातून विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे.

Exit mobile version