| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील गोडसई येथे दरवर्षीप्रमाणे हजरत सय्यद बालेपीर शाहबाबा यांचा ऊरुसाचे आयोजन मंगळवार, (दि.27) व बुधवार, दि. 28 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. यानिमित्ताने 27 फेब्रुवारीला आसरबाद नमाजनंतर ग्यारवी शरीफ होऊन मगरीब नमाजनंतर संदल शरीफ मिरवणूक गावात फिरविण्यात येईल. त्यानंतर दर्ग्यातील समाधीवर चादर अर्पण करण्यात येणार आहे. तर बुधवार, दि. 28 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता प्रसिद्ध कव्वाल छोटे माजिद शोला (किंग ऑफ गझल), जानी शैदा (किंग ऑफ गझल) यांच्यात कव्वालीचा मुकाबला होणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक दिलावरभाई मांडलेकर व अलिमभाई मांडलेकर यांनी दिली.







