राजकारणासाठीच इंजिनिअरिंगचा उपयोग

धैर्यशील पाटील यांनी दिला आठवणींना उजाळा
। पेण । प्रतिनिधी ।
इंजिनियरींगचा व्यवसायी दृष्ट्या मी उपयोग केला नाही. मात्र, इंजिनियरींगचा उपयोग मला राजकारणात मोठ्या प्रमाणात झाला. कारण इंजिनियरींगमध्ये शिकवले जात की, धैर्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुटून पडायचे असत आणि ते मी राजकारणात केले म्हणूनच यशस्वी झालो.असे प्रतिपादन माजी आ.धैर्यशील पाटील यांनी केले. कोकण एज्युकेशनच्या इंजिनियरींग कॉलेज पेण येथील विद्यार्थ्यांच्या सविध गेट टू गेदर (1983 ते 2008) या कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्यासह प्राचार्य राज महाजन, माजी विद्यार्थी किर्ती पाटील, राजू शेख आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

आज शैक्षणिक संस्थांचा विचार केला तर पहिल्यांदा अर्थकारणाचा विचार केला जातो. ज्यावेळी 1983 ला हे महाविद्यालय सुरू झाले. त्यावेळेला येथे येणारे विद्यार्थी हे आपल्या पेणकरांपेक्षा खुप काही वेगळे आहेत. परंतु, ज्यावेळेला आम्ही इंजिनियरींगसाठी अ‍ॅडमिशन केले तेव्हा समजले की हे देखील आपल्या सारखेच आहेत. आज या व्यासपिठावरून बोलताना मी एवढच सांगेन की, मला प्रमुख अतिथीमध्ये स्थान दिले आहे, ते फक्त मी या इंजिनियरींग कॉलेजचा माजी विद्यार्थी असल्यामुळेच, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी माजी प्राचार्य, एस.एस.गणकुळे यांनी अनेक आठवणी सांगत, शानदार कविता सादर केल्या. गणकुळे हे बोलत असताना कोठेही नव्वद वर्षाचे आहेत असे वाटत नव्हते. त्यानंतर मनोगत करणारे प्रा.मुजावर यांनी आपले अनुभव सांगताना आशियामध्ये सर्वात फास्ट पी.एच.डी कशी केली या विषयी भाष्य केले. पुढे अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपआपुले अनुभव आपल्या मित्रांना शेअर केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांनी सांगितले की, आज 40 वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थी एकत्र येणे ही बाब देखील वाखाखण्यासारखी आहे. कोकणावर माझे विशेष प्रेम आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांना कधीही बोलवा नक्की मी आवर्जुन उपस्थित राहीन.

आज आमच्या स्वागतासाठी जे पुष्पगुच्छ वापरले ते पुष्पगुच्छ ज्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. ही संस्था आईच्या मायेनी या मुलांवर संस्कार करत आहे, हे पाहून खुप बरे वाटले. माजी विद्यार्थ्यांचे गेट टू गेदर कार्यक्रम झाले पाहिजेत. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, असे शेवटी सांगितले.

दत्ता पाटील यांचे योगदान
धैर्यशील पाटील यांनी आपल्या भाषणातून आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, मला आवर्जून दत्ता पाटील यांची आठवण काढणे क्रमप्राप्त वाटते. कारण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य पोरांचा इंजिनियर होण्याचे स्वप्न त्यांच्यामुळेच पूर्ण झाले. इंजिनियरींगच्या प्रवेशासाठी गेलेल्या मुलांना फक्त ते रायगड मधले आहेत एवढेच कॉलीफिकेशन पुरे व्हायचे. कधी त्यांनी अर्थकारणाला प्राधान्य दिले नाही. असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

Exit mobile version