नाईक-अंतुले महाविद्यालयात लसीकरण

। म्हसळा । वार्ताहर ।
वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेचे उद्घाटन डॉ. प्रियांका देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. सुमित चव्हाण यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता प्रा. कानिफ भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी प्रा. सुरेश दुंडे, प्रा. सलमा नझिरी, प्रा. अतिका नझिरी, प्रा. तनुजा शेख, पी.एच.सी. म्हसळाचे श्रध्दा पाटील, कविता गदरी, सुजता पाटील, नंदिनी जाधव, सागर सायगावकर, हे उपस्थित होते.

Exit mobile version