| खरोशी | वार्ताहर |
अलिबाग येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कराटे विभागात रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील पिरकोन विद्यालयातील वैदेही योगेश घरत हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले आहे.
जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत 15 तालुक्यामधून कराटे पटूंनी सहभाग घेतला होता. वैदेही घरत हिने 17 वर्षे वयोगट आणि 50 ते 60 वजनी गटात सहभाग घेतला होता. सुरुवातीच्या फेऱ्यापासून वैदही घरतचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता प्रत्येक सामन्यात तीने प्रतिस्पर्धकावर वर्चस्व राखले. शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता टिकून असलेल्या या लढतीत वैदहीने विजय मिळवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. या यशाबद्दल शाळेच्या स्कूल कमिटीचे चेअरमन जीवन गावंड, दहागाव माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष कृष्णा पाटील रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे विभागीय अधिकारी कोंगेरे एम. के. आदींनी अभिनंदन केले.
शाळेच्या प्राचार्य सौ ए.ए. पाटील यांनी सांगितले की आमचे विद्यार्थी केवल अभ्यासातच नाही तर क्रीडा क्षेत्रातही चमकत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.तसेच विद्यालयाचे क्रीडा प्रमुख डाढाले बी.बी. यांनी खूप मेहनत घेतली. विद्यालयातील पाटील पी एम, म्हात्रे एस आर, सौ. पाटील एस सी. सौ पाटील एम एस आणि सर्व सेवक वृंद यांनी वैदेहीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







