| कर्जत | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील सुमारे 300 वर्षे पेक्षा अधिक पुरातन वैजनाथ देवस्थानची जमीन हस्तांतरण होताना संबंधित योग्य परवानग्या न घेता अहिंदू सलीम बिलाखीया या व्यक्तीच्या नावे होऊन लगेच अल्पावधित राजकीय व्यक्तींनी विकत घेतली. या व्यवहारात घोटाळा झाला असून, त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी कर्जतमध्ये निदर्शने करून केली आहे.
भाजप नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यातील किरवली येथील डी मार्ट समोर तीव्र निदर्शने करण्यात करण्यात आली, तसेच धरणे आंदोलनही करण्यात आले. यावेळी जमीन आमच्या देवाची आहे, नाही कुणाच्या बापाची, वैजनाथ जमीन घोटाळा चौकशी झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले.
यावेळी भाजप कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, कर्जत तालुका सरचिटणीस संजय कराळे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, बळवंत घुमरे, सचिन म्हसकर, स्नेहा गोगटे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, सरस्वती चौधरी, वकील ऋषीकेश जोशी, सुषमा ढाकणे, भगवान ऐनकर, विजय जिनगरे, माजी नगरसेविका बिनिता घुमरे, गायत्री परांजपे, संदेश कराळे, मिनेश मसणे, केशव तरे, मयूर शितोळे, विजय कुलकर्णी, प्रभाकर पवार, अंकुश मुने, सर्वेश गोगटे आदी उपस्थित होते.