| चिपळूण । वार्ताहर ।
देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी निमित्त भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा,चिपळूण तालुका,शहर संपर्क कार्यालयात चिपळूण तालुक्यातील सर्व पदाधिकार्यांनी अभिवादन केले. यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस नागेश धाडवे,विनोद भोबस्कर, परिमल भोसले, अभय चितळे,शुभम पिसे,ओंकार बापट, गणेश नलावडे, उल्हास भोसले, महेश विंचू ,सुरज पेठकर, अमेय सुर्वे, विक्रम आग्रे , गणेश आग्रे,वैष्णवी पवार उपस्थित होते.