| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी उभी करून जेवणासाठी गेलेल्या नागरिकांच्या गाडीची काच फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. यावबाब पनवेल तालुका पोलीस ठाण्यात एक एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश शिंदे हे पंतनगर-घाटकोपर येथे राहत असून दि.1 एप्रिल रोजी ते मुंबईकडे येत होते. दुपारच्या सुमारास गो ग्रीन हॉटेल कल्हेगाव येथे जेवणासाठी थांबले व गाडी हॉटेलच्या बाहेरील पार्किंगमध्ये पार्क केली. त्यानंतर पार्क केलेल्या ठिकाणी ते आले असता फॉर्च्यूनर (एमएच-01-एएक्स-7848) या गाडीची काच फुटलेली दिसली. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता एक टोपी घातलेला अनोळखी व्यक्ती गाडीजवळ येऊन काच फोडून गाडीतील वस्तू चोरी करून मोटरसायकल वरून निघून गेल्याचे दिसून आले. त्यांच्या गाडीतून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्ड, लॉकरच्या चाव्या असा एकूण 13 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.







