विज्ञान प्रदर्शनांतर्गत विविध स्पर्धा

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुका विज्ञान प्रदर्शन अंतर्गत तालुक्यातील निबंध, वत्कृत्व व प्रश्‍नमंजुषा स्पर्धा मेंहेंदळे हायस्कूल येथे संपन्न करण्यात आल्या. तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने संपन्न करण्यात आलेल्या या स्पर्धेतंर्गत इयत्ता सहावी ते आठवी निबंध स्पर्धेत आर्या जाधव एमपीएसएस कोलाड प्रथम क्रमांक, निष्ठा भातिकरे एमडीएन वरसगाव द्वितीय क्रमांक, सरीना धनसे प्राथमिक शाळा खैरेखुद तृतीय क्रमांक, वत्कृत्व स्पर्धेत मंजिरी तांबोळी पीएनपी हायस्कूल पळस प्रथम क्रमांक, दिशा हाळदे श्रमिक विद्यालय चिल्हे द्वितीय क्रमांक, अक्षरा गोरिवले तिसे हायस्कूल तृतीय क्रमांक तर प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत वैदेही म्हात्रे व काव्या मिसाळ गु. रा.अगरवाल हायस्कूल नागोठणे प्रथम क्रमांक, निष्ठा भातिकरे व श्रावणी शिंदे एमडीएन स्कूल वरसगाव व्दितीय क्रमांक, वीणा पंडित तेंडुलकर स्कूल रोहा तृतीय क्रमांक यांनी पटकावले. मोठा गट(इ.9 वी ते 12 वी) निबंध स्पर्धा उस्ताद रीमशा अंजुमन स्कूल रोहा प्रथम क्रमांक, आश्‍लेषा सानप एमपीएसएस कोलाड व्दितीय क्रमांक, इल्हम दुकानदार रोहा पब्लिक स्कूल रोहा तृतीय क्रमांक वत्कृत्व स्पर्धा जान्हवी बिरगावले तिसे हायस्कूल प्रथम क्रमांक, स्वरा नांदगावकर एमबी पाटील स्कूल वरसे व्दितीय क्रमांक, रुचिता मांडलेकर सानेगुरजी विद्यालय सानेगाव तृतीय क्रमांक तसेच प्रश्‍न मंजुषा स्पर्धा प्रेक्षा यादव व साहिल नरे एमडीएन स्कूल वरसगाव प्रथम क्रमांक, पार्थ भोईर व मृदुला साळुंखे द. ग.तटकरे स्कूल कोलाड व्दितीय क्रमांक, अनु शर्मा व हिबा शेख एस.पी.जैन ज्युनि.कॉलेज नागोठणे यांनी तृतीय क्रमांक पटकावले.

Exit mobile version