दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रम

| उरण | वार्ताहर |

दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी द्रोणागिरी गडाची सफाई, रक्तदान शिबीर, मशाल फेरी, दीपोत्सव, बाळ शिवाजी राजांचा पाळणा हलवणे, शिवप्रतिमा पूजन, प्रतिमा मिरवणूक, शिवराज्याभिषेक, दुर्ग पूजन, पोवाडा, व्याख्यान असे विविध कार्यक्रम करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभाग, आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था, युवा शिवशक्ती मित्र मंडळ डाऊरनगर चारफाटा, योगा विथ पूनम ग्रुप, सीआयएसएफ स्टाफ उरण, डाऊरनगर ग्रामस्थ आणि शिवप्रेमी मित्र परिवार आदी संस्थानी मेहनत घेतली.

Exit mobile version