वसंत मोरेंच्या हाती मशाल

| मुंबई | प्रतिनिधी |

माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मंगळवारी (दि. 9) मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करीत हाती मशाल घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पूर्वीपेक्षा अनेक पटीने पुण्यात शिवसेना वाढवा, असे आवाहन शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना केले. वसंत मोरे पुणे महापालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत हडपसर किंवा खडकवासला या मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version