| भाकरवड | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील देहेन गावच्या वसुंधरा संजय जुईकर यांचे रविवार, दि.23 नोहेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी त्या 55 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण देहेन पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. स्व. वसुंधरा जुईकर यांच्या पार्थिवावर देहेन गावाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक,आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, मित्रपरिवार उपस्थित होता. स्व. वसुंधरा जुईकर यांच्या पश्चात पती संजय जुईकर, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी, तर तेरावे शुक्रवार, दि. 5 डिसेंबर रोजी राहत्या घरी होणार आहे.







