वाहनांची चोरी
। पनवेल । वार्ताहर ।
कामोठे वसाहतीमध्ये उभी करून ठेवलेल्या चार चाकी वाहनाच्या चोरीची घटना घडली आहे. वैभव जाधव यांनी त्यांची गाडी क्रमांक एमएच-46-बीइ-3904 हि घरासमोरील मंदिराच्या बाजूला उभी करून ठेवली असता, अज्ञात चोरट्याने सदर गाडी चोरून नेल्याने एयाबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लाखोंचा ऐवज लंपास
। पनवेल । वार्ताहर ।
एका बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. खारघर सेक्टर 3 येथे राहणार्या जयश्री धराडे यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाज्याचा काडी कोयंडा तोडून आत मध्ये असलेले 1 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन तो पसार झाला आहे. याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.