कराटेत विहूरच्या खेळाडूंची बाजी

कोर्लई, वार्ताहर

पुणे येथे 13 ऑगस्ट रोजी झालेल्या इंडिपेन्डेन्स कप राष्ट्रीय स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कराटेपटूंनी बाजी मारली आहे. मुरुडच्या डॉ. देव मार्शल आर्ट्‌स अकॅडमीने चार सुवर्ण, एक रौप्य, एक कांस्यपदक पटकावत तालुक्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. या स्पर्धेचे स्पर्धेचे आयोजन हंशी हसन इस्माईल यांनी केले होते. तालुक्यातील विहूर येथील हुसेन फैसल उलडे दोन सुवर्णपदक, आल्हान अन्सारी एक सुवर्ण, एक कांस्य, मुहम्मद फैसल उलडे एक सुवर्ण, एक रौप्यपदक पटकाविले आहे. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांतून 550 खेळाडू सहभागी झाले होते. मुरुडच्या खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून मोईनुदिन उर्फ साहील अन्सारी होते तर संघ व्यवस्थापक म्हणून फैसल उल्डे हे होते. संस्थेचे मुख्य प्रशिक्षक डॉ. महादेव शिंदे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुरुड-विहूरच्या इकरा इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी हुसेन उलडे मुहंमद उलडे व नज हायस्कूलचा विद्यार्थी आल्हान अन्सारी खेळाडूंनी बाजी मारत मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version