| तळा | वार्ताहर |
रायगड जिल्हा परीट सेवा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा तळा येथे रविवारी पार पडली. या सभेत विलास गणपत तळेकर यांची रायगड जिल्हा परीट समाज अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. रायगड जिल्हा समाजाची सभा महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळाचे उपाध्यक्ष शांताराम सहदेव कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत दिलीप सुर्वे सचिव, दीपक कदम उपाध्यक्ष, चंद्रकांत घाग उपाध्यक्ष, किशोर वासकर कार्याध्यक्ष, दीपेश तळेकर सहसचिव अशी पदाधिकारी निवड करण्यात आली.
यावेळी शांताराम भाऊ कदम, प्रकाश पवार, नंदकिशोर राक्षे, अनील सुर्वे, भारती जाधव, नथुराम येलकर, बाबुराव कान्हेकर, रविंद्र कान्हेकर, संजय गायकवाड, सुरेश निजामकर, लता केशव पेणकर, दिव्या सुर्वे, विद्या तळेकर, राजेश्री गायकर, नेहा वासकर, अनिता भावेकर, दीपिका वासकर, निलीमा वारसकर आदी उपस्थित होते.