रायगडात महाडसह 5 तालुक्यात गावठी दारू जप्त

। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात आठ ठिकाणी दारूबंदीचे गुन्हे दाखल झाले असून जवळपास आठ हजार रूपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली असून आरोपीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दारूबंदीच्या दाखल झालेल्या या गुन्ह्यांमध्ये महाड येथे 3 गुन्हे दाखल झाले असून महाडमधून जवळपास 3 हजार सातशे 50 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच खालापूर येथे 1 हजार 90 रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली असून कर्जत येथे 980 रुपये किंमतीची तर वडखळ येथे 960 रूपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर रोहा येथे देखील हात हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. या सर्व गुन्ह्यांमधील गावठी दारू जप्त आरोपीतांना ताब्यात घेतले असून सदर पोलिस ठाणे यावरील अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version