प्राधिकरणाच्या नियोजनाचा बसला होता फटका
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ विकास संकुल प्राधिकरणमधील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीमधील अनेक रस्ते पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत. नगररचना विभाग आणि जिल्हा परिषद यांची नेरळ विकास प्राधिकरण ममदापूर ग्रामपंचायतमधील नियोजन करीत आहे. मात्र, प्राधिकरणाचे नियोजन फसल्याने स्थानिकांना रस्त्याने चालतादेखील येत नव्हते. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी नेरळ विकास प्राधिकरण विरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतर प्राधिकरणाने तात्पुरता इलाज म्हणून नेरळ-ममदापूर रस्त्यावर पाईप मोरी टाकून रस्ता चालण्यायोग्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत स्थानिक ग्रामस्थ माजी उप सरपंच कृष्णा शिंगे, स्थानिक कार्यकारताइ रोशन शिंगे, ऍड विपुल हिसालके यांनाही नेरळ प्राधिकरण विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आणि त्यामुळे नेरळ विकास प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकारी आणि अभियंते यांच्यावर मोठा दबाव आला. नेरळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नेरळ ममदापुर तसेच पाण्यात बुडालेल्या रस्त्यांची पाहणी केली आणि त्यानंतर नेरळ ममदापूर रस्त्यावर रस्त्याची स्थिती लक्षात घेऊन तात्काळ रस्त्यावर साचून राहिलेले पाणी पाहून जाण्यासाठी मार्ग निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यात नवीन पाईप खरेदी करून तेथे पाईप मोरी टाकण्यासाठी जेसीबी मशीन तसेच खडी मागवून घेतली. अधिकारी वर्गाने ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाईप मोरी टाकल्यानंतर पाणी वाहून जाण्याचा मार्ग निर्माण झाला आहे.
दरम्यान नेरळ प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकारी उपअभियंता निलेश खिल्लारे आणि शाखा अभियंता देशमुख यांच्याकडून एका रस्त्यावर पाणी बाजूला करण्याची कोणतीही कार्यवाही झालेली आहे, मात्र ममदापूर गाव आणि नवीन वसाहत भागात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठलेले असून पाण्यातून रस्त्यात असून त्या रस्त्यानबाबात कोणतीही कार्यवाही प्राधिकरणाने केलेली नाही. त्यामुळे ममदापूर गावातील ग्रामस्थांचे प्रश्न कायम आहेत.