विराज नारंगीकर ठरला ‌‘खासदार श्री’

| चिरनेर | प्रतिनिधी |

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुक्रवारी (दि.11) जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही शरीर सौष्ठव स्पर्धा रोहा येथे मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी उरण तालुक्यातील चिरनेर येथील विराज नारंगीकर हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून त्याला ‌‘खासदार श्री 2025′ हा किताब देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील विविध तालुके, शहर आणि विभागातून मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाले होते. विराजला शरीर सौष्ठव या क्षेत्राबद्दल लहानपणापासून विशेष अशी आवड होती. त्यामुळे त्याच क्षेत्रात आपले करिअर करण्याचे मानस असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या यशाबद्दल चिरनेर गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि ग्रामस्थ यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version