ब्लू जर्सीत मैदानात उतरणार कोहलीची कंपनी

। मुंबई । वृत्तसंस्था ।
आयपीएल 2021 च्या सेकंडहाफ मधील सामने युएई मध्ये 19 सप्टेंबर पासून सुरु होत आहेत. येथे 20 सप्टेंबरला विराटची रॉयल चँलेंजर बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये होणार्‍या सामन्यात विराट आणि कंपनी ग्रीन ऐवजी ब्लू जर्सीत मैदानात उतरणार आहे. यामागचे कारण म्हणजे करोना महामारीमध्ये फ्रंटलाईन वर्कर्सनी समाजासाठी जे निस्वार्थ योगदान दिले त्यांना मानवंदना देणे हे आहे.

ट्विटरवरच्या टीमच्या अधिकृत अकाऊंटवर या संदर्भात केलेल्या पोस्टमध्ये, ब्लू जर्सी घालताना अभिमान आणि गौरव वाटतो कारण हा रंग कोरोना फ्रंटलाईन योद्ध्यांच्या पीपीई किटच्या रंगाशी मिळताजुळता आहे. कोव्हिड विरुद्ध लढाईत त्यांनी अमुल्य सेवा दिली आहे त्यांना श्रद्धांजली देणे हाही उद्देश आहे आणि कोरोना लढाई अजून संपलेली नाही हे सांगण्यासाठी सुद्धा आहे. मास्क लावणे, लस घेणे, हात धुणे यासाठी प्रेरणा देण्याचाही प्रयत्न आहे असे म्हटले आहे.

Exit mobile version