राज्यस्तरीय स्पर्धेत विश्‍वनाथ ठाकूरला तीन सुवर्णपदके

। रसायनी । वार्ताहर ।
अकोला येथे 42 ही राज्यस्तरीय स्पर्धेत सामग्री संघटन मुंबई इंडियन नेव्ही मध्ये काम करणारा विश्‍वनाथ हरी ठाकूर यांनी तीन सुवर्ण पदके पटकावून घसघशीत यश मिळवले आहे.
सामग्री संघटन मुंबई इंडियन नेव्हीमध्ये काम करणारे कामगार विश्‍वनाथ ठाकूर याने अकोला येथे झालेल्या 42 वी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता गोळाफेक ,थाळीफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले नेपाळ येथे झालेल्या थाळीफेक स्पर्धेत गोल्ड मेडल, क्टोबर मध्ये भोसरी पुणे थाळीफेक, हातोडा फेक, गोळा फेक गोल्ड मेडल, नोव्हेंबर पंचवटी नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत गोळा फेक मधे बॉन्स मेडल, इंदापूर पुणे येथे थाळीफेक, गोळाफेक गोल्ड मेडल तर भालाफेक मधे सिल्व्हर मेडल, डिसेंबर 2019 मध्ये प्रबोधन क्रीडाभवन गोरेगाव येथे झालेल्या स्पर्धेत थाळीफेक स्पर्धेत गोल्ड मेडल, गोळा फेक मध्ये गोल्ड मेडल तर भालाफेक स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल, 27 ते 28 डिसेंबर 2019 बोईसर कांदिवली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये थाळीफेक मध्ये गोल्ड मेडल, गोळाफेक मध्ये गोल्ड मेडल, अशे अनेक मेडल यांना मिळाले असुन. नविन वर्षाची सुरुवात करुन त्यांची हैद्राबाद येथे होणार्‍या नॅशनल स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली. असुन तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव आहे.

Exit mobile version