। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
यंदाची आशियाई स्पर्धा 2022 चीनमध्ये 10 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. ऑल इंडिया चेस फेडरेशनला त्यांचे पुरूष आणि महिला संघ आशियाई स्पर्धेत मेडल पदक जिंकतील अशी आशा आहे. यासाठी फेडरेशनने दिग्गज ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला एक वेगळी भुमिका देऊ केली आहे.
ऑल इंडिया चेस फेडरेशनने आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे की, आम्ही आशियाई स्पर्धेत आमचे चार सुवर्ण पदके जिंकण्याचे टार्गेट असेल. त्यासाठी आम्ही दिग्गज ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला एक वेगळी भुमिका देणार आहोत. तो आता संघाचा मेंटॉर असणार आहे. खेळाडूंचे त्याच्यासोबतचे पहिले सत्र पुढच्या गुरूवारपासून सुरू होईल.
ऑल इंडिया चेस फेडरेशनने स्पर्धेची तयारी लवकर सुरू केली आहे. त्यांनी 10 पुरूष आणि 10 महिल खेळाडूंचा संभाव्य संघ देखील निवडून ठेवला आहे. हे संघ खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय रँकिंग लक्षात घेऊन निवडला आहे. पुरूष संघात वैदित गुजराथी, पी हरीकृष्णा, निहाल सरिन, एस.एल नारायणन, के. ससिकिरण, बी. अधिबन, कार्तिकेयन मुरली, अर्जुन इरिगासिस, अभिजीत गुप्ता आणि सूर्या शेखर गांगुली यांचा समावेश आहे. तर महिलांच्या संघात के. हम्पी, डी. हरिका, वैशाली आर., तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी, वनतिका अग्रवाल, मेरी अॅन गोमेज, सौम्या स्वामिनाथन आणि इशा करवडे यांचा समावेश आहे.