। रसायनी । वार्ताहर ।
स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचे संपूर्ण देशामध्ये 51 ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मीनारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी भोपाळ या ठिकाणी झालेल्या सॉफ्टवेअर एडिशन विभागांमध्ये खालापूर तालुक्यातील कुंभिवली येथील विश्वनिकेतन इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.
मध्यप्रदेश पोलीस विभागाने दिलेल्या डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ फेस रिकगनायझेशन टेक्निक्स फॉर मध्य प्रदेश पोलीस डिपार्टमेंट प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मार्फत मिळालेल्या आरोपीच्या फोटो वरून आरोपीचे लोकेशन, त्याच्या घरचा पत्ता, फोन नंबर इत्यादी गोष्टींची माहिती मिळवली. आरोपीच्या स्केचेस आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची माहिती मिळवणे, स्त्रिया किंवा व्हीआयपी लोकांसाठी सुरक्षित मार्ग शोधणे इत्यादींवर संशोधन केले. या टीममधील जयेश थत्ते, सुदनवा कांची, अनुष्का साहू, अमित रजेगावकर, पंकज चव्हाण, विक्रम देवाडीकर विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमकरून मध्य प्रदेश पोलिसांना आरोपीला शोधण्यासाठी नवीन सोल्युशन दिले.