| नेरळ | वार्ताहर |
कर्जत शहरातील नव मतदार नोंदणी कार्यक्रम कर्जत शहर शिवसेना शिंदे गट आणि आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन यांच्या वतीने भरविण्यात आले होते. दहीवली भागातील इंदिरा नगर परिसरात झालेल्या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक संकेत भासे आणि अभिषेक सुर्वे यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमास कर्जत तसेच दहिवली परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी अभिषेक सुर्वे, कडू, सचिन भोईर, सचिन खंडागळे, पंकज पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्जतमध्ये मतदार नोंदणी शिबिर
