। तळा । वार्ताहर ।
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने राष्ट्रीय मतदान दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी शुक्रवारी (दि.17) रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साक्षी प्रकाश गायकवाड यांनी केले. तसेच, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक डॉ. राजाराम महादेव थोरात यांनी केले. या रांगोळी स्पर्धेमध्ये 22 महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
भारतामध्ये लोकशाही प्रशासन व्यवस्था असल्यामुळे देशातील सुज्ञ मतदारांना अतिशय महत्त्व असते. देशाचा सर्वांगीण आर्थिक विकास हा लोकांनी मतदानाद्वारे निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून असतो. त्यामुळे देशातील मतदार हा जागृत असला पाहिजे. हे रांगोळीच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी अधोरेखित केले. या रांगोळी स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून विनोद कोलवणकर यांनी परीक्षण केले. या रांगोळी स्पर्धेमध्ये स्मिता प्रदीप डोंबल प्रथम, श्रुतिका गोरीवले व अस्मिता धांदूत द्वितीय, प्रगती क्षीरसागर तृतीय तर नंदिनी महादेव काते उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला आहे. यावेळी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.