| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी माणगाव तालुक्यातील निजामपूर, तळाशेत, मोर्बा, गोरेगाव जिल्हा परिषद गट व पाटणूस, निजामपूर, तळाशेत, साई, वडवली, मोर्बा, गोरेगाव व लोणेरे पंचायत समिती गणासाठी शनिवारी शांततेत मतदान झाले. माणगाव तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे व माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून कोण निवडून येणार याची उत्सुकता तालुक्यातील जनतेला लागून राहिली आहे.
माणगाव तालुक्यात शांततेत मतदान
