पुणे | प्रतिनिधी |
नोव्हेंबर संपत आला तरी राज्यात थंडीचा जोर अद्याप वाढलेला नाही.उलट अवकाळी पावसाच्या हजेरीने सार्यांचीच त्रेधात्रिपीट उडाली आहे. ढगाळ हवामान व पावसामुळे थंडी गायब झाली असून कमाल तापमानात होत असलेली चढ-उतार कायम आहे. तर राज्यात यापुढे पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आता हवामानात बदल होत असल्याने मुख्यत: कोरड्या हवामानाची शक्यता आहे. त्यामुळे आता किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने नमूद केले आहे.